वाढीव वीज बिलाच्या विरोधात उद्योजकाची जिल्लाधिकरिना निवेदन

वाढीव वीज बिलाच्या विरोधात उद्योजकाची जिल्लाधिकरिना निवेदन.

 

बेळगाव:

उद्योजकांसाठी वाढीव वीज बिलाचा फटका उद्योगधंद्यांवर परिणाम करणारा ठरणार आहे . त्यामुळे औद्योगिक वीज बिलात भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ बेळगावातील उद्योजकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला . बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना दरवाढ मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

बेळगावातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी, उद्योजकदेखील वीज दरवाढीमुळे त्रासले आहेत. हेस्कॉमने दुप्पट-तिप्पट वीजबिले पाठवण्याचा सपाट सुरु केल्याने संतापाचे वातावरण आहे. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली लघुउद्योजक संघटना, फौंड्री क्लस्टर, इन्स्टिटयूट ऑफ इंडियन फौंड्रीमेन, हॉटेल मालक संघटना आदी विविध संघटनांच्या सदस्यांनी बेळगाव शहरात भव्य मोर्चा काढून सरकारचे याकडे लक्ष वेधले.

यावेळी शरद पाटिल,रोहन जुवळी, राम भंडारे, महादेव चौगुले, दयानंद नेतलकर, रमेश देसुरकर, राजू वर्पे,यांच्यासह चेंबर आणि अन्य संघटनांचे पदाधिकारी सदस्यांनी या मोर्चात सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post पहिल्याच दिवशी 5.71 लाख महिलांनी बसने प्रवास केला: खर्च किती झाला?
Next post योजनेची माहिती देण्यासाठी हेल्पलाइनला दरमहा ₹ 4 लाख रुपये