अखेर मॉन्सून केरळात दाखल; भारतीय हवामान विभागाकडून पुष्टी
कोची :
उन्हाच्या चटक्यानंतर शेतकऱ्यांची नजर आता आकाशाकडे लागली आहे. पावसाचा अंदाज घेत शेतात पुन्हा पेरणी/लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची तगमग सुरू झालेली दिसत आहे. मात्र, दरवर्षी सामान्यपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यंदा ८ जूनला मान्सून केरळात दाखल झाला आहे. म्हणजेच यावर्षी मान्सूनला केरळात दाखल व्हायला ७ दिवस उशीर झाला आहे.
यंदा बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनवर परिणाम झाला आहे. सुरुवातीच्या काळात मान्सून कमी तीव्रतेचा असेल, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. मान्सूनच्या आगमनानंतर पहिल्या आठवड्यातील प्रवासावरून त्याच्या देशातील पुढील वाटचालीचा अंदाज बांधता येणार आहे
केरळनंतर आता मान्सून तामिळनाडू, कर्नाटक आणि इतर भागात जाईल. पुढील ४८ तासात केरळच्या सर्व भागांमध्ये मान्सूनची हजेरी लागणार आहे. चक्रीवादळ गेलं की, मान्सून पूर्ण तीव्रतेने देशाच्या इतर भागात वाटचाल करेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.