बेळगाव नागरिकांनी गुंडां राज नाकारून विकासाला निवडले ….अभय पाटील

बेळगाव नागरिकांनी गुंडां राज नाकारून विकासाला निवडले ….अभय पाटील

बेळगाव:

बेळगाव दक्षिण भागातून निवडून आलेले विद्यमान आमदार अभय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बेळगाव दक्षिण मतक्षेत्रामधून पुन्हा एकदा विजय मिळवून या क्षेत्रात तिसऱ्यांदा आमदार पदी विराजमान झाल्या निमित्त मंगळवार दिनांक 06 जून रोजी वार्ड क्रं.42 रहिवासीच्या वतीने आ.अभय पाटील यांचा जाहीर सत्कार भाग्यनगर 5 व क्रॉस, येथे करण्यात आला.

सुरुवातीला फटाकडी वाजवून आ.अभय पाटील यांचा स्वागत करण्यात आला आणि प्रवेश द्वारपसून स्टेज पर्यंत पुष्प वर्षा आणि आरती करून स्वागत केलं गेलं.

नगर सेवक अभिजित जवळकर यांनी आमदार अभय पाटील यांना शाल आणि श्रीफळ देवून सत्कार केले. त्यांचा सोबत त्यांचे सर्व कार्यकर्ते स्टेजवर उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर सत्कार मूर्ती आ.अभय पाटील  सोबत महापौर सौ.शोभा सोमंन्हाचे, भरत देशपांडे,आणि नगर सेवक अभिजीत जवळकर उपस्थीत होते. तसेच वार्ड क्र. 42 मधील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.था कार्यक्रमात श्री रघुनाथ बोडगी, श्री उमेश बोरमाळ , एम.जी.शशिधर, आणि श्री बसवेत साईनेकर सर यांनी आ.अभय पाटील यांच्या बद्दल आपले विचार मांडले

श्री सुखकर्ता कॉलनी ,गुहमोहार कॉलनी ,कृषी कॉलनी संजय पोतदार, श्री अनील देशपांडे ,विजय व विवेक धामणेकर यांच्या व्यतिरिक्त एकूण 15 मंडळ यांनी अभय पाटील यांचा सत्कार केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजयशंकर बांदिवेडेकर यानी  केले व सर्वांचे आभार मानले.

आ.अभय पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की बेळगावकरानी गुंडा राज नाकारून अभिवृद्धीला निवडले. शिक्षित लोकांनी ठरवलं तर समाज बदलू शकतात. उत्तम कार्यक्रम आयोजित केेल्या बद्दल, नगर सेवक अभिजीत जवळकर आणि त्यांचा टीम यांचा कौतुक केले की आणि त्यांना पुन्हा एकदा निवडून दिल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आणि लोकांचे आभार मानलें

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post बेळगावात छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव मंजूर.
Next post “ग्रहाजोती” मध्ये सगळ्यांना 200 युनिट मोफत नाही !?