बेळगावात छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव मंजूर.

बेळगावात छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव मंजूर.

बेळगाव :

सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव महानगरपालिकेत आज बुधवारी विकास आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत मंत्री जारकीहोळी यांनी महानगरपालिका हद्दीत स्मार्ट सिटी योजना अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामांची सविस्तर माहिती घेतली. स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शहर सौंदर्यकरणाचे कामही सुरू आहे याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर शहरात प्रलंबित विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करावे अशी सूचना करतानाच, बेळगाव शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.याची आठवण काढून देताना, बेळगाव शहरात एक कोटी रुपये खर्च करून छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा लवकरात लवकर उभारण्याची सूचना केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post जनते चे समस्या सोडविण्यास प्रथम प्राधान्य : मंत्री सतीश जारकीहोळी
Next post बेळगाव नागरिकांनी गुंडां राज नाकारून विकासाला निवडले ….अभय पाटील