मंत्री आणि अमदारत फाईट…. मनपा अधिकरिंचा हवा टाईट..
बेळगाव :
शहरात स्मार्ट सिटी योजने अंतर्गत निकृष्ट दर्जाचे कामकाज झाले आहे.स्मार्ट सिटी योजनेत अनेक समस्या आढळल्या आहेत. शिवाय बुडामध्येही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पुढे आला असून बेळगाव मधील भाजपच्या आमदारांच्या हातचे बाहुले बनून काही अधिकारी कार्यरत आहेत. कायदा सोडून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना गेटपास दिला जाईल,असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज दिला आहे.
आता मंत्रीमहोदय विरुद्ध आमदार असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. आमदारांच्या सांगण्यावरून कामे कराल तर तुम्हाला गेटपास दिला जाईल असा इशारा मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला आहे. आतापर्यंत मनपाच्या कारभाराची सूत्रे हाती ठेवलेल्या आ. अभय पाटील यांना थेट आव्हानच दिले आहे. राजकीय सूड उगविण्यासाठी आता हा नवा संघर्ष सुरू झाला आहे. यामध्ये मनपा अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जर आमदारांचे ऐकून कामे करावीत तर मंत्रीमहोदय आपल्यावर बदलीचा बडगा उगारतील, अशी धास्ती अधिकारी वर्गाला लागली आहे. या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या कचाट्यात मनपा आयुक्तांची तारांबळ उडणार आहे. त्यामुळे आता या तापलेल्या राजकारणात अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.