पुलावरून लॉरी ५० फूट खाली पडून अपघात
बेळगाव :
चालकाचे लॉरीवरील ताबा सुटल्याने मालप्रभा नदीच्या पुलावरून पडल्याची घटना ए के हुबळीजवळ घडली. सुदैवाने या अपघातात चालक सुखरूप बचावला.बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील एमके हुबळी गावाजवळ मलप्रभा नदीवर बांधण्यात आलेल्या अंदाजे ५० फूट पुलावरून एक कँटर खाली पडला आहे.मात्र, चालक चमत्कारिकरित्या बचावला .महाराष्ट्रातील रामदास गोडे (४२) हा चालक आहे.पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चिक्कमंगळूरहून महाराष्ट्रात लाकूड घेऊन जाणारे कॅन्टर वाहन नदीत पडल्याची घटना घडली.अपघाती गर्दीत लॉरीचा पूर्ण चुराडा झाला.बेळगावातील कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.