सतीश जारकीहोळी बेळगाव जिल्ह्याच्या आणि लक्ष्मी हेब्बाळकर विजयनगरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती 

सतीश जारकीहोळी बेळगाव जिल्ह्याच्या आणि लक्ष्मी हेब्बाळकर विजयनगरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती 

बेळगाव :

बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अखेर अपेक्षेप्रमाणे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची नियुक्ती झाली आहे, तर बेळगाव ग्रामीण आमदार आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची विजयनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.बेंगलोरहून हा आदेश आज (शनिवार) सकाळी जारीकरण्यात आला. सर्व 31 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार विजापूरच्या पालकमंत्रीपदी एम बी पाटील, बागलकोटच्या पालकमंत्रीपदी शिवानंद पाटील तर कारवारच्या पालकमंत्रीपदी मंकाळू वैद्य यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. धारवाड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी संतोष लाड यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ज्येष्ठ मंत्री के जे जॉर्ज हे बेंगलोरचे पालकमंत्री असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post भीषण रेल्वे अपघातात दोन नाही तर तीन गाड्या:मृतांचा आकडा 200  वर
Next post महाभारत फेम सरबजीत ” गुफी ” पेंटल यांचा निधन