आ. अभय पाटील यांच्या हस्ते श्री विशाल खर्गेकर याचा सत्कार.
बेळगाव :
कोरे गल्ली, शहापूर येथील कॉर्नर जवळील कमान ध्वजासहित पडला असताना आनंदवाडी येथील श्री विशाल खरडेकर या बालकाने भर पाऊसात धाव घेत भगवा ध्वज हाती घेत सुरक्षित ठेवला. बेळगाव महानगरातील या बालकावर झालेले संस्कार, भगवा ध्वजावरील प्रेम,भगवा ध्वजाबद्दल असलेला अभिमान हे कौतुकास्पदआहे त्या निमित्त त्या बलाकाचे मनानिय आमदार अभय पाटील व महापौर सौ.शोभा सोमन्नाचे आणि सर्व नगरसेवक यांच्या हस्ते बालकाचा सत्कार करण्यात आला,
बेळगावकरांची शिवभक्ती, बेळगावकरांचे हिंदूत्व आणि शिवभक्तांचे भगव्यावरील प्रेम जगजाहीर आहे. बेळगावात छत्रपती शिवराय आणि भगव्याच्या बाबतीत उत्तुंग प्रेम निष्ठा आणि स्वाभिमान पहायला मिळतो अन्त्याची झलक रविवारच्या पावसात पाहायला मिळाली.
कोरे गल्ली कॉर्नर (शहापूर) येथे पावसात भव्य कमानीवरील भगवा ध्वज कमानीसह खाली पडला.यावेळी आनंदवाडी येथील श्री. विशाल खर्गेकर या मावळ्याने पावसाची तमा न बाळगता भिजत झेंडा उचलला होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्या मुलाचे गल्लीतील नागरिकांनी कौतूक केल आहे.