बेळगाव (प्रतिनिधी) : लंडन येथील भारतीयांनी प्रतिवर्षी
प्रमाणे यंदा एजीएलपी इंटरप्रेजेस यांनी आयोजित केलेल्या ‘ मिस आशिया जी. बी. 2023″ मध्ये बेस्ट कॅट्वाक, बेस्ट टॅलेंट, आणि पीपल्स चॉईस अवार्डचे टायटल मिळवून आर्या नाईकने सहाव्या फेरीमध्ये “मिस आशिया जी.बी. 2023” हा मुकुट पटकाविला.
आर्या सध्या लंडन येथील बर्ण माउथ युनिव्हर्सिटी मध्ये मार्केटिंग अँड पी.आर. हा अभ्यासक्रम करीत असून,मागच्या आठवड्यात दुसरे वर्ष संपले आहे. एक वर्ष प्लेसमेंट आणि दुसऱ्या वर्षात पदवी पूर्ण होणार आहे.
आर्या ही लंडन स्थित भारतीय श्री. विनीत नाईक यांची कन्या, ‘बेळगाव समाचार’ या साप्ताहिकाचे संस्थापक कै.प्रभाकर परुळेकर यांची पणती, तसेच भरतेश इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. योगिता पाटीलयांची भाची होय.