मस्तमर्डी गावात पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू
मस्तमर्डी गावात पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू
बेळगाव :
पोहायला गेलेल्या मुलाचा पाण्यात डोक्याला दगड लागून पाण्यात बुडून मृत्यू झाला. बेळगाव तालुक्यातील मस्तमर्डी गावातील कृष्णा बसवराज हणबार (वय 16) या मुलाचा मृत्यू झाला.तो रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मरकट्टी क्रॉसजवळील सिद्धनभावी तलावात पोहण्यासाठी गेला होता.
पाण्यातील दगड डोक्यात आदळल्याने मुलगा गंभीर जखमी होऊन पाण्यात बुडाला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केलीयं.