भाजप राबवणार देशभरात जनसंपर्क अभियान

भाजप राबवणार देशभरात जनसंपर्क अभियान

नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या प्रवासातील मोदी सरकारचं यश सांगण्याची जबाबदारी आता केंद्रीय मंत्र्यांवर देण्यात आली आहे.

सोमवारी (29 में) केंद्रीय मंत्री देशभरात एकाच वेळी पत्रकार परिषद घेणार आहेत. या दरम्यान देशातील प्रत्येक राज्याच्या राजधान्यांमध्ये केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.

जेथे भाजपचे सरकार असेल तिथे केंद्रीय मंत्री त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह पत्रकार परिषद घेतील आणि जिथे भाजपचं सरकार नसेल तिथे केंद्रीय मंत्री पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह माध्यमांना संबोधित करतील. यावेळी मोदी सरकारच्या गेल्या 9 वर्षातील सर्व कामगिरीवर आधारित सादरीकरणही करण्यात येणार आहे.

तसेच,मोदी सरकारनं केलेल्या महत्त्वपूर्ण कामाचा, प्रकल्पांचा आढावा घेतला जाईल.’या शहरांमध्ये प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन मुंबईत, अनुराग ठाकूर अहमदाबादमध्ये, मीनाक्षी लेखी बेंगळुरूमध्ये, हरदीप पुरी लखनौमध्ये, अश्विनी वैष्णव गुवाहाटीमध्ये, भूपेंद्र यादव भोपाळमध्ये, अर्जुन राम मेघवाल हैदराबादमध्ये, जितेंद्र सिंह चेन्नईमध्ये, गजेंद्र सिंह पटना, मनसुख मांडविया कोलकात्यात स्मृती इराणी रोहतकमध्ये आणि पीयूष गोयल जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post २४ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
Next post मस्तमर्डी गावात पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू