आज वडगावात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक
बेळगाव :
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त परंपरेनुसार वडगाव परिसरात शुक्रवारी (दि. २६) संध्याकाळी चित्ररथ मिरवणूक निघणार आहे. त्यासाठी विविध शिवजयंती उत्सव मंडळांनी तयारी केली आहे.
वडगाव परिसरात शहराच्या एक दिवस आधी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येते. यंदा शहराची शनिवारी (दि.२७) चित्ररथ मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे शुक्रवारीवडगाव परिसरातील चित्ररथ मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत नऊ चित्ररथ सहभागी होणार आहेत.
संध्याकाळी ६ वाजता मिरवणुकीला प्रारंभ होणार असून मिरवणुकीसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध सजिव देखाव्यांची तयारी केली आहे. पारंपरीक महाटमोळ्या वातावरणात ही मिरवणूक निघणार आहे.