शनिवारी लक्ष्मी हेब्बाळकर, लक्ष्मण सवदी यांची मंत्रिपदाची शपथविधी

शनिवारी लक्ष्मी हेब्बाळकर, लक्ष्मण सवदी यांची मंत्रिपदाची शपथविधी

बेंगळुरू :

काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला असून आज 20 जणांची यादी निश्चित होण्याची शक्यता आहे.बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, लक्ष्मण सवदी यांच्यासह 20 आमदारांची मंत्रीपदासाठी नावे निश्चित करण्यात आली आहे. शनिवारी (२७ मे) रोजी सकाळी ११.४५ वाजता शपथविधी होणार आहे.

यामध्ये लक्ष्मी हेब्बाळकर, ईश्वर खंद्रे, शिवानंद पाटील, बसवराज रायरेड्डी, शरणबसप्पा दर्शनपुर, डॉ. एच. सी. महादेवप्पा, शिवराज तंगडगी, भैरथी सुरेश, कृष्णा भैरेगौडा, के. व्यंकटेश, एस. एस. मल्लिकार्जुन, रहीम खान, डॉ. अजय सिंग, सी. पट्टरंगशेट्टी, एच. के. पाटील, एम. पी. नरेंद्रस्वामी, एम. सी. सुधाकर, डी. सुधाकर, बी. नागेंद्र किंवा के. एन. राजन्ना, दिनेश गुंडूराव, आर. व्ही. देशपांडे, बी. के. हरिप्रसाद, डॉ. शरणप्रकाश पाटील, लक्ष्मण सवदी यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post श्री समर्थ पादुका पूजन कार्यक्रम शांताई वृद्धाश्रमामध्ये उत्साहात.
Next post महिला गृहलक्ष्मी योजना  मिळवण्यासाठीही कागदपत्रे असणे आवश्यक आहे.