यू . टी . खादर यांची सभापतीपदी म्हणून बिनविरोध निवड
बेंगळुरू : वृत्तसंस्था
माजी मंत्री आमदार यू. टी. खादर यांची विधानसभेचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून आमदार यू. टी. खादर यांची बिनविरोध निवड झाली असून आर. व्ही. देशपांडे यांनी खादर त्यांच्याकडे पदभार सोपवला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नूतन अध्यक्ष यू. टी. खादर यांचे अभिनंदन केले. यू. टी. खादर हे अतिशय उत्साही आणि सक्रिय राजकारणी असून ते 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सरकारच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कर्नाटक विधानसभेच्या इतिहासात प्रथमच मुस्लीम आमदारासाठी ही संधी उपलब्ध झाली आहे.