शनिवारी 27 मे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक
बेळगाव :
शहरातील ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला शनिवारी (ता. 27) सायंकाळी सहा वाजता नरगुंदकर भावे चौक येथून सुरुवात होणार आहे. यावेळी शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती शिवजयंती मंडळातर्फे केले आहे.
विधानसभा निवडणुकीमुळे चित्ररथ मिरवणूक पुढे ढकलली होती. त्यानंतर शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून शनिवारी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. नरगुंदकर भावे चौक येथे पूजन करून पालखी मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरील सजीव देखावे सादर करून समाजाला प्रेरणा देण्याचे काम केले जाते.त्यामुळे चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी चंदगड, निपाणी, कोल्हापूर, गोवा आदी भागातील शिवप्रेमी येतात.