किश्तवाडमध्ये मजुरांना घेऊन जाणारं वाहन उलटलं, सहा जणांचा मृत्यू

किश्तवाडमध्ये मजुरांना घेऊन जाणारं वाहन उलटलं, सहा जणांचा मृत्यू

जम्मू :

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये आज (24 मे) एक भीषण अपघात झाला. इथे धरणावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारे क्रूझर वाहन उलटलं. या अपघातात सहा मजुरांचा मृत्यू झाला. तर तीन मजूर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

किश्तवाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना डांगदुरु पॉवर प्रोजेक्टजवळ घडली. या प्रकल्पावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारं क्रूझर वाहन पलटी झालं. हा अपघात सकाळी 8.35 च्या सुमारास झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे.तर तीन जखमी मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इथे बचावकार्य सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post वादळी वाऱ्यामळे शहापुर स्मशान भूमी येथील पत्रे उडून नुकसान.
Next post शनिवारी 27 मे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक