श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत डॉल्बी मुक्त. 

श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत डॉल्बी मुक्त. 

बेळगाव :

येत्या दि. 27 रोजी शहरात श्री शिवजयंती मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. शहराच्या पारंपरिक आणि सांस्कृतीक वैभवाचा घटक असणारी ही मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी खडेबाजार पोलीस स्थानक येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत श्री शिवजयंती मिरवणूक आचरणाच्या संदर्भात विविध सूचना करण्यात आल्या. तसेच मिरवणूक यशस्वी करण्याबाबत श्री शिवजयंती महामंडळाच्या सदस्यांनी आपले विचार मांडले. शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत डॉल्बी लावू नये आणि शांततेत मिरवणूक पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन खडे बाजार पोलीस उपायुक्त अरुण कुमार कोळ्ळूर यांनी केले.

मिरवणुकीत कुणीही डॉल्बी लावणार नाही, असा निर्धार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केला. पोलिस प्रशासनानेही डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, अशा सूचना दिल्या.

शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, रणजित पाटील, विनायक बावडेकर, नगरसेवक राजू भातकांडे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रोहन जाधव,अनंत बामणे, मेघन लगरकांडे, विजय जाधव, अरुण पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post अभय पाटील यांच्या हस्ते कार्यकर्ते आणि त्यांच्या परिवारांचा सत्कार 
Next post लाच घेताना लोकायुक्तां च्या जाळ्यात पोलीस कर्मचारी