अभय पाटील यांच्याहस्ते कार्यकर्ते आणि त्यांच्या परिवारांचा सत्कार
बेळगाव:
कार्यकर्ते हेच माझे पाठबळ:
आपल्या अभिनव उपक्रमांतून राज्यभर नाव कमावणारे भाजपचे आमदार अभय पाटील यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. निवडणुकीच्या काळात काही उमेदवार कार्यकर्ते आपले देव असल्यासारखे बोलतात.पण निवडणुका संपल्या आणि जिंकून विधानसभेची पायरी चढली की त्याच कार्यकर्त्यांशी संबंध नाही असे वागतात.
कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या कुटुंबाचा ही सत्कार:
आमदार अभय पाटील यांनी निवडणुकीच्या काळात त्यांच्या विजयासाठी कष्ट घेतलेल्या फक्त कार्यकर्त्यांचाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठांचाही सन्मान हा त्यांच्या कार्यालयात अभिनव व अर्थपूर्ण कार्यक्रमाद्वारे केला .
घरचे संस्कार:
जेव्हा एखाद्या आमदाराचा सामान्य जनतेसोबत ग्रुप फोटो काढला जातो तेव्हा आमदार लोकांना जमिनीवर बसवून स्वतः खुर्चीवर बसतात पण अभय पाटील हे एकमेव असे आमदार ज्यांनी ज्येष्ठ लोकांना वरती बसवून स्वतः सर्वांसोबत खाली बसून फोटो काढले , हा मोठ्यांना दिलेला आदर म्हणता येईल ,जो त्यांचावर झालेले संस्कार दर्शवतो.
कार्यकर्त्यांचे कौतुक करताना अभय पाटील भावूक:
अशा दुर्मिळ कार्यक्रमात बोलताना आमदार अभय पाटील काही क्षण भावुक झाले.असे कार्यकर्ते फक्त भाजप पक्षातच दिसतात, असे ते म्हणाले.माझ्या विरोधकांनी मला या निवडणुकीत पराभूत करण्याचा खूप प्रयत्न केला, काहींना धमक्याही दिल्या.पण आमचे कार्यकर्ते अशा धमक्या आणि आमिषांना बळी पडले नाहीत.
अभय पाटील यांचे मावळे:
याशिवाय आमच्या पक्षाच्या नगर सेवकांनीही मनापासून काम केले आहे.ही सर्व कारणे माझ्या विजयाचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमात बेळगाव दक्षिण मतदारसंघातील 250 हून अधिक बूथ लेव्हल अध्यक्ष, 23 नगर सेवक आपल्या कुटुंबीयांसह सहभागी झाले आणि आमदार अभय पाटील यांनी केलेला सन्मान स्वीकारले.