वर्कहोलिक आमदार अभय पाटील लोक सेवेत रुजू.
बेळगाव : प्रतिनिधी
गेल्या अनेक महिन्यांपासून भाग्यनगर 5 वां क्रॉस, येथील रस्ते खराब झाल्यामुळे वाहनचालक व प्रवाशांचे हाल होत होते. त्यामुळे हा रस्ता तातडीने करण्याची मागणी होत होती. अखेर या रस्त्याच्या डांबरीकरणाला शुक्रवारी प्रारंभ झाला.यामुळे वाहनचालक व प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. या रस्त्यावरुन वाहने चालविणे देखील कठीण बनले होते.यामुळे रस्ता डांबरीकरणाची मागणी सातत्याने होत होती.अखेर आमदार अभय पाटील यांनी या रस्त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
आ. अभय पाटील यांनी स्वतः मटेरियल चे तापमान चेक करून खात्री करून घेतली . कामाला चालना दिल्यानंतर ते लवकर पूर्ण करावे,अशी सूचना आ. पाटील यांनी ठेकेदाराला केली. यावेळी नगरसेवक अभिजीत जवळकर आणि इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.