आठवड्याभरात होणार विरोधी पक्ष नेत्याची निवड
बेंगलोर वृत्त संस्था :
भारतीय जनता पक्षाच्या संसदीय गटाची आठवडाभरात बैठक घेऊन विधानसभा विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात येईल अशी माहिती कार्यवाहक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.बोम्मई यांनी आज बेंगळुरातील आरटी नगर येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीबाबतच्या प्रश्नावर बोलताना बोम्मई म्हणाले की, येत्या आठवडाभरात विधानसभेवर निवडून आलेल्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेण्यात येईल.
त्याबाबत प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करणार आहे. संसदीय गटाच्या या बैठकीत चर्चा करून सर्वानुमते विरोधी पक्षनेता ठरविण्यात येईल. पक्षात अनेक अभ्यासू नेते आहेत. कोणाचीही वर्णी या पदी लागू शकते. असे ते म्हणाले.विधानसभा निवडणुकीतून बोध घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी कशाप्रकारे आत्मावलोकन करणार? या प्रश्नावर, ‘प्रतीक्षा करा’ एवढेच उत्तर त्यांनी दिले.