5 मंत्रिपदे व उपमुख्यमंत्रिपद देण्याची मुस्लिम समाजाची मागणी
बेंगलोर वृत्तसंस्था
कर्नाटकात काँग्रेसल स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठल्याचं स्पष्ट आहे. काँग्रेसने राज्यात जोरदार प्रचार करणाऱ्या भाजपाचा दणदणीत पराभव केला आहे. यासह भाजपाचं राज्यात पुन्हा सत्तेत येण्याचं स्वप्न भंगलं असून, दक्षिणेतील एकमेव राज्यंही गमावलं आहे. दरम्यान, यानंतर काँग्रेसकडून आता राज्यात सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु झाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 88 टक्के मुस्लिमांनी काँग्रेसला मतदान केले.
त्यामुळे बहुमत काँग्रेसकडे आले असून, आमच्या समाजासाठी उपमुख्यमंत्रिपद व 5 मंत्रिपदे द्यावीत, अशी मागणी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शफी सादी यांनी केली आहे. सादी म्हणाले की. राज्यात 73 आमदार जिंकून देण्यात मुस्लिमांचा महत्त्वाचा वाटा आहे. कर्नाटकातील सर्व 224 मतदारसंघांपैकी 15 मतदारसंघांमध्ये मुस्लिमांनी निवडणूक लढवली. त्यापैकी 9 जण विजयी झाले.
यापूर्वी एस. एम. कृष्णा मुख्यमंत्री असताना मुस्लिम समाजातून निवडून आलेल्या पाच आमदारांना सरकारमध्ये मंत्रिपदे देण्यात आली होती. त्यामुळे आता नव्याने अस्तित्वात येणाऱ्या काँग्रेस सरकारमध्येही पाच मंत्रिपदे आणि उपमुख्यमंत्रिपद द्यायला हवे. अशी मागणी त्यांनी केली आहे.