बेळगाव :
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी महत्त्वाची
असणारी सीईटी २० ते २२ मेपर्यंत होणार आहे. त्यामुळे
बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे.
त्यानुसार २३ मेपासून पुरवणी परीक्षेला विविध केंद्रांवर
सुरुवात होणार आहे.
९ ते २९ मार्चपर्यंत बारावीची परीक्षा झाली होती. काही
दिवसांतच पेपर तपासणीचे काम करून १५ दिवसांत
बारावीचा निकाल जाहीर केला होता. निकाल जाहीर
झाल्यानंतर अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. या
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी २२
मेपासून पुरवणी परीक्षा घेण्यात येणार होती मात्र २०, २१ व २२ मे रोजी सीईटी होणार आहे.
त्यामुळे परीक्षा वेळापत्रक बदल केला असून, जे विद्यार्थी सीईटी देणार आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेचा निकाल ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले होते. त्याला प्रतिसाद देत झाले आहेत.