स्टार एअरचे बेळगावमधून जयपूरला विमानफेरी सुरू
प्रतिनिधी
देशातील गुलाबी शहर अशी ओळख असणाया जयपूरला सोमवार दि. १५ पासून बेळगावमधून विमानफेरी सुरू झाली. स्टार एअरचे संचालक श्रेणिक घोडावत यांच्या उपस्थितीत या. फेरीचा शुभारंभ झाला. कर्नाटक, कोकण व गोव्यातून प्रथमच जयपूरला विमानफेरी सुरू झाल्याने उत्तम प्रतिसाद प्रवाशीया मिळाला.
स्टार एअर या विमान कंपनीने बेळगाव- जयपूर, बेलगाव बंगळूर या मार्गावर सोमवारपासून विमान सुरू केली. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस ही विमानफेरी असणार आहे. ५० आसन क्षमता असणारे व प्रवाशांची ये-जा करणार आहे.
पहिल्याच दिवशी या विमानफेरीला उत्तम प्रतिसाद मिळाला. अवघ्या सवा दोन तासात बेळगावहून जयपूर विमानतळावर प्रवासी पोहोचल्याने या विमानफेरीला भविष्यात उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त
करण्यात आला.संस्कृतीचीही देवाण-घेवाण होणार उद्घाटनप्रसंगी संचालक श्रेणिक घोडावत म्हणाले; बेळगाव जयपूर या उद्योगांसोबतच विमानफेरीमुळे संस्कृतीचीही देवाण-घेवाण होणार आहे. या दोन्ही शहरांमध्ये व्यावसायिक क्षमता असून या फेरीला चांगला प्रतिसाद मिळेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी स्टार एअरचे सीईओ सिमरनसिंग तिवाना यांच्यासह स्टार एअरचे अधिकारी तसेच बेळगाव विमानतळाचे अधिकारी उपस्थित होते.