डीजीपी प्रवीण सूद यांची सीबीआय संचालकपदी नियुक्ती
नवी दिल्ली वृत्तसंस्था :
कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद यांची केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयचे पुढील संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर केंद्र सरकारने रविवारी 14 मे, त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले.
सीबीआयच्या नवीन संचालकांच्या नियुक्तीसाठी शनिवारी (13 मे) सायंकाळी उच्चस्तरीय बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यावेळी उपस्थित होते . या बैठकीत सीबीआयच्या नवीन संचालकाची निवड करण्यासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा झाली आणि नंतर प्रवीण सूद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.