15000 नोटा’चे मतदार बेळगाव जिल्ल्यात
बेळगाव :
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात तब्बल 15 हजार मतं ‘नोटा’ला पडली आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 224 जागांपैकी 135 जागांवर विजय मिळवला. तर भाजपला फक्त 66 जागांवर विजय मिळवण्यात यश आले. कर्नाटक विधानसभेसाठी बुधवारी मतदान झाले. त्यानंतर शनिवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यामध्ये रायबागला सर्वाधिक 1860 मतं नोटाला झाले आहेत.
निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांसह प्रतिस्पर्धी उमेदवारांना पडलेली मते याची माहिती देण्यात आली. यामध्ये उमेदवारांपैकी एकाही उमेदवार पसंतीला न आल्यास ‘नोटा’ला मतदान करण्याचा पर्याय असतो. यामध्ये 15 हजार मते नोटाला पडली आहेत.