आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिपद मिळणार ?
आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिपद मिळणार ?
बेळगाव :
विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये प्रतिष्ठीच्या बनलेल्या बेळगाव ग्रामीण मतदारसंघात आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. त्यामुळे आता स्थापन होणाऱ्या काँग्रेस सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने महिला बालकल्याण किंवा धर्मादाय खात्याचे मंत्रिपद त्यांच्याकडे चालून येईल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे. राज्यात बेळगाव ग्रामीण मतदारसंघाला मिळणारा हा पहिला मान ठरेल, अशी चर्चा कार्यकर्त्यांमधून होत आहे.