लिंगायत समाजाला दुखवण भाजपला महागात पडले ?
बंगळुरु :वृत्तसंस्था
माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा जगदीश शेट्टर,उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी या लिंगायत समाजाच्या पॉवरफुल नेत्यांना बाजूला करणे भाजपला भोवले. स्वतंत्र लिंगायत धर्माला मान्यता देण्याचा प्रस्ताव फेटाळण्याच्या भूमिकेचाही फटका बसल्याचे दिसते.
लिंगायतांची लोकसंख्या 17 टक्के “असून, 14 जिल्ह्यांत त्यांचा प्रभाव आहे. भाजपने येडियुरप्पा आणि शेट्टर यांना वयाचे कारण देत बाजूला केले होते. पण, येडियुरप्पा सोबत नसतील तर 16 टक्के लिंगायत मते काँग्रेसकडे वळू शकतात, याची जाणीव झाल्याने भाजपने नंतर त्यांना काही जबाबदारी दिली. परंतु त्यांचे खच्चीकरण भाजपला चांगलेच महागात पडल्याचे स्पष्ट दिसून आले.