अभय पाटील यांची हॅटट्रिक, विरोधकांची विकेट

अभय पाटील यांची हॅटट्रिक, विरोधकांची विकेट

बेळगाव:

 

बेळगाव दक्षिण मतदारसंघातून भाजप चे विद्यमान आमदार अभय पाटील पुन्हा एकदा  निवडून आले आहेत.अभय पाटील यांना 76 हजार 249 मते मिळाली तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुस्कर यांना 64 हजार 487 मते मिळाली अभय पाटील यांनी 11 हजार 762 मतांनी विजय मिळवला.

आपल्या विजयाच्या संदर्भात बोलताना अभय पाटील यांनी मला दक्षिण मतदार संघातील मतदारांनी मला आपला  समजून भरघोस मतदान केले आहे. झालेल्या मतदानाचे सारे श्रेय मतदारांबरोबरच कार्यकर्ते यांनाही आहे. अशी प्रतिक्रिया  दिली आहे.

 

त्यांचा विजय काही विरोधकांना आणि समाज कंटकांना पचलेला दिसत नाही म्हणून त्यांच्या विजयरथ यात्रेवर काही कंटकांनी आरपीडी क्रॉस जवळ दगड फेक केली .परंतु पोलिसांनी वेळेत मध्यस्थी करून परिस्थिती हाताळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post थांबलेल्या कंटेनरसह १६ कार जळून खाक
Next post मान्सून 8 जूनला दाखल!हवामान तज्ज्ञ डख यांचा अंदाज