थांबलेल्या कंटेनरसह १६ कार जळून खाक

निपाणी:

पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागूनअसणाऱ्या हिटणी फाटा येथे पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या धाब्यावर थांबलेले होते. अचाकनपणे दोन कंटेनरना आग लागली. या आगीत कंटेनरमध्ये असलेल्या 16 कार कारसह दोन कंटेनर जळून खाक झाले आहे. यामध्ये कोट्यावधीची हानी झाली आहे. या घटनेत सुदैवाने

कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना शुक्रवारी दुपारी 12.30 च्या सुमारास घडली.याबाबतची अधिक माहिती अशी की, चेन्नई येथून अहमदाबादला नवीन कार घेऊन जाणारे दोन कंटेनरचे चालक जेवणासाठी धाब्यावर थांबले होते. दरम्यान अचानकपणे या दोन्ही कंटेनरना भीषण आग लागली.

यानंतर धाबा मालक, पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी पोलीस तसेच अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली.माहिती मिळालेनंतर घटनास्थळी निपाणी, संकेश्वर व हुक्केरी येथील अग्निशामक दलाच्या तीन बंबासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र तत्पूर्वीच दोन कंटेनरसह कार जळून खाक कोट्यावधीचे नुकसान झाले होते. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. या परिसरात पेट्रोल पंप असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शर्तीने आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. परंतु ही आग उशिरापर्यंत धुमसत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post उद्या बेळगावातील स्ट्राँग रूमच्या आसपास कलम 144 लागू
Next post अभय पाटील यांची हॅटट्रिक, विरोधकांची विकेट