सेप्टिक टँकची सफाई करताना कामगारांचा मृत्यू,

परभणी :

सेप्टिक टँकची सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शिवारात घडली आहे. तर एक जण अत्यवस्थ असल्याची माहिती मिळाली आहे. रात्री सेप्टिक टँक स्वछ करण्यासाठी कामगार आत उतरले होते. यावेळी पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

परभणी जिल्ह्यात सेप्टिक टँकची सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं भाऊचा तांडा शिवारात शोककळा पसरली आहे. मृत झालेल्या पाच कामगारांमध्ये शेख सादेक (वय 55), शेख जुनेद (वय 32 ) शेख शारोक (वय 28), शेख नवीद (वय 28), शेख फेरोज (वय 29) यांचा समावेश आहे. अत्यवस्थ असलेल्या एका कामगाराला परळी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मृत पाचही कामगारांचे मृतदेह परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post दहावी पुरवणी परीक्षा जूनमध्ये 
Next post उद्या बेळगावातील स्ट्राँग रूमच्या आसपास कलम 144 लागू