राज्यात पुन्हा भाजपचे सरकार सत्तेवर येणार: अभय पाटील
बेळगाव :
बेळगाव : कर्नाटक विधानसभेसाठी आज बुधवारी मतदान केले जात आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. बेळगावचे जिल्हा निवडणूक अधिकारी असलेले जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी विश्वेश्वरय्या नगर सरकारी शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले.
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आज होसूर येथील सरकारी मराठी शाळेतील मतदान केंद्रावर कुटुंबियांसमवेत जाऊन मतदान केले. यावेळीही राज्यात भाजपचे सरकार, अन बेळगावमध्ये भाजप उमेदवारांचा विजय निश्चित होईल अशा शब्दांत आ.अभय पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, बेळगाव दक्षिण आणि उत्तरमध्ये भाजपचेच उमेदवार निवडून येतील तसेच यावेळी राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येइल अस प्रतक्रिया व्यक्त केली.
गेल्यावेळी आपण ५८ हजार मताधिक्क्याने निवडून आलो होतो. यावेळी लोक ७५ हजारहून अधिक मताधिक्क्याने निवडून देतील असा विश्वास दर्शवला.