अभय पाटलांच्या पाठीशी नारीशक्ती ठाम …25000 महिलांनी स्वयंस्फूर्तीने घेतला प्रचारफेरीत भाग.
बेळगाव:
बेळगाव दक्षिणमध्ये अभय पाटील यांच्या प्रचारासाठी हजारोंच्या संख्येने संघटीत झालेल्या नारीशक्तीने अभय पाटील यांच्या विजयाचा निर्धार प्रकट केला. स्वयंस्फूर्तीने संपूर्ण मतदार संघात फेरी काढून त्यांच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे चित्र स्पष्ट केले.
त्यामुळे आता अभय पाटील हे विजयाच्या मार्गावर असून त्यांना निवडून आणण्यासाठी मतदार सज्ज झाल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीसाठी महिला मतदारांची मते अत्यंत महत्त्वाची मानली जातात.
वडगाव येथील शाळा क्रमांक 14 येथून या महिलांच्या फेरीला प्रारंभ झाला. तेथून नाथ पै चौक, कोरे गल्ली, कचेरी गल्ली, शहापुर मार्केट करत शिवचरित्र येथे या फेरीची सांगता झाली. अभय पाटील यांनी मागील पाच वर्षाच्या कालावधीत मतदार संघात अनेक विकासकामे राबविली आहेत.
त्यामुळे या भागातील मतदार बांधवांनी त्यांच्या प्रचारासाठी स्वयंमस्फूर्तीने कार्य केले आहे. आता महिलांनी देखील यामध्ये हिरीरीने सहभाग दर्शवून अभय पाटील यांच्या विजयासाठी कंबर कसली असल्याचे दिसत आहे.