अभय पाटील यांचा बालेकिल्ला होसूर शहापूर येथे झंझावात प्रचार फेरी
बेळगाव प्रतिनिधी
अभय पाटील यांची बालेकिल्ला होसुर शहापूर येथून शुक्रवारी सकाळी निघालेल्या प्रचार फेरीने प्रचंड जल्लोषी वातावरण निर्माण केले. होसुर मधील बसवान गल्ली आणि आसपासच्या रहिवाशांनी या प्रचार फेरीत सहभाग घेतला होता .भव्य अशा या प्रचार फेरीने शहापूरचा परिसर दणाणून सोडला होता.
होसूरसह शहापूर भागात आणि इतर भागातून निघालेल्या प्रचार फेरीने जणू विजयाचे वातावरण निर्माण केले होते. यावेळी अभय पाटील यांच्या पाठीशी उभे राहून भाजपचा बाजूने मतदान करण्याचा निर्णय येथील मतदारांनी व्यक्त केला .
पक्ष कार्यकर्त्यांसह, नागरिक देखील या प्रचार फेरीत सहभागी झाले होते. त्यामुळे ही प्रचार फेरी लक्षवेधी ठरली होती गल्लोगल्ली अभय पाटील यांचे उत्साही स्वागत करण्यात आले. यावेळी अभय पाटील यांनी केलेल्या विकास कामांच्या संदर्भात मतदारांनी त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची तयारी चालवली असल्याचे दिसून आले.