लोक झाले अभय मय आणि अनगोळ परिसर झाला भगवामय
बेळगाव दक्षिण मतदारसंघात अभय पाटील यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. उपनगर भागात झंझावती प्रचारकार्य गतिमान झाले असून, कार्यकर्ते मतदारांशी सातत्याने संपर्क साधून मतदानाचे आवाहन करीत आहेत. मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी उमेदवार अभय पाटील आणि या भागातील नगरसेवक सातत्याने कार्यरत आहेत.
आज अनगोळ येथे झालेल्या प्रचार फेरीत अभय पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या ऐतिहासिक प्रचार फेरीमध्ये मारुती गल्ली अनगोळ येथील कार्यकर्त्यांनी क्रेनच्या साहाय्याने भला मोठा पुष्पहार अभय पाटील यांना घालण्याचे ठरवले होते पण अभय पाटील यांनी ह्या पुष्पहाराचे खरे मानकरी छत्रपती शिवाजी महाराज आहेत असे म्हणत त्यांनी तो हार महाराजांच्या मूर्तीला अर्पण केला… त्यांच्या ह्या कृतीने संपूर्ण युवा वर्गात एक आदर्श निर्माण झाला तसेच वातावरण उत्साहित झाले.
एकूणच काय ,तर अभय पाटील निवडून आलेत आणि त्यांची विजयी फेरी निघालेली आहे असेच वातावरण निर्माण झाले होते.