सांगली :
आज सकाळी ट्रॅव्हल्स आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. विटा-सातारा रोडवर नेवरी गावाजवळ ही घटना घडली. यामध्ये सदानंद दादोबा काशीद हे जखमी झाले असून त्यांची पत्नी सुनीता सदानंद काशीद, त्यांचा भाऊ चंद्रकांत दादाबो काशीद, मेव्हणा अशोक नामदेव सुर्यवंशी (सर्वजन रा. गव्हाण, ता. तासगाव) आणि मालाड (मुंबई) येथील बदली गाडी चालक योगेश कदम हे जागीच ठार झालेत.
पोलिसांनी दिलेल्याद माहितीनुसार, गुरूवारी सकाळी विट्याकडून ट्रॅव्हल्स (एआर-01-जे-8452) ही गाडी विटा- महाबळेश्वर राज्य मार्गावरून साताराच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी साताराकडून येणारी फोर्ड फिएस्टा ही कार विटाच्या दिशेने भरधाव वेगाने येत होती. विटा हद्दीतील शिवाजीनगर परिसरातील अकरा मारुती मंदिराच्या पुढे राज्यमार्गावर असलेल्या उताराच्या ठिकाणी हा अपघात झाला. कार गाडीमध्ये एकूण पाच जण प्रवास करीत होते. अपघाताची विटा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.