अभय पाटील म्हणजे विकास.. विकास म्हणजे अभय पाटील : देवेंद्र फडणवीस
बेळगाव:
अभय पाटील यांच्यासारख्या मावळ्यांनी देशात विकासाच्या मार्गावरून वाटचाल करण्याचा संकल्प केला आहे त्यामुळे आजपर्यंत भाजपच्या राजवटीतील राज्यांची प्रगती होत आली आहे. असे विचार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
उद्यमबाग येथील फाउंड्री क्लस्टरच्या सभागृहातील आयोजित कार्यक्रमात त्यांनी भाजपच्या प्रगतीचा आढावा घेतला. देशभरात अनेक राज्यांनी प्रगतीची नवी स्वप्ने पाहिली आहेत .ती साकार करण्यासाठी भाजपला संधी दिली आहे. त्या राज्यांनी विकासाचा उच्चांक गठलेला आहे. त्यामुळे कर्नाटकात देखील हा विकास अधिक गतिमान करण्यासाठी भाजपला विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
बेळगाव दक्षिण मधील भाजपचे उमेदवार अभय पाटील यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली. या सभेच्या वेळी उपस्थित मान्यवरांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले तसेच भाजपच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.
अभय पाटील यांनी बोलताना आपण केलेल्या कार्याबद्दल विचार मांडले. त्यावेळी उपस्थितांनी त्यांच्या नावाचा जयघोष केला. तसेच त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. या सभेमध्ये विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच सामाजिक क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.