बेळगाव:
बेळगाव उत्तरचे उमेदवार श्री डॉ. रवी पाटील यांच्या प्रचारार्थ कंग्राळ गल्ली बेळगाव येथे कर्नाटक मराठा समाज विकास मंडळाचे कर्नाटक राज्य अध्यक्ष डॉ एम जी मुळे यांनी मार्गदर्शन देऊन संवाद साधला त्यांनी यावेळी शेतकरी, बेरोजगार युवक, महिला कल्याण आणि विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अशा विविध योजना कर्नाटक मराठा समाज विकास मंडळातर्फे ग्रामीण आणि शहरी भागात राबवत असल्याची माहिती दिली .
तसेच मराठा समाजासाठी भाजप कर्नाटक सरकारने केलेल्या कार्याबद्दल या मतदारसंघातील नागरिकांना माहिती दिली. यावेळी कंग्राळ गल्लीतील पंच मंडळ बाबुराव कुट्रे, भाजपा बेळगावी जिल्हा मध्यम प्रमुख व बेळगाव ऑटोमोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष शरद पाटील गोपाळ सांबरेकर अशोक कंग्राळकर दौलत मोरे, भाजपा पदाधिकारी उमेश बडवानाचे ,रणजितसिंग रोकडे किरण सांबरेकर आणि कंगराळ गल्लीतील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.