किच्चा नावाच्या गुगलीने अभय पाटील यांनी विरोधकांची उडविली विकेट
बेळगाव :
चित्रपट अभिनेते किच्चा सुदीप यांनी सोमवारी बेळगाव दक्षिणचे भाजप उमेदवार अभय पाटील यांच्या वतीने रोड शोच्या माध्यमातून प्रचार केला.किच्चा सुदीपने खुल्या वाहनातून सुमारे 2 किमीचा रॅली प्रवास केला.
उमेदवार अभय पाटील यांच्यावतीने त्यांनी प्रचार केला.खासबाग बसवेश्वर सर्कलपासून सुरुवात करून त्यांनी वडगाव व इतर विविध ठिकाणी रोड शो केला.हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि चाहत्यांनी रॅलीमध्ये फुलांचा वर्षाव करून सुदीपचे स्वागत केले.आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी मोठ्या संख्येने चाहत्यांनी रांगा लावल्या होत्या.
एकूण किच्चा नावाची गुगली टाकून अभय पाटील यांनी विरोधकांची विकेट उडविली म्हंटल तर गैर ठरणार नाही .