बेळगाव :
बेळगाव दक्षिण मधील भाजपचे उमेदवार अभय पाटील यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या प्रचारासाठी हिंदवाडी आणि आनंदवाडी या भागात झंझावात प्रचारफेरी काढण्यात आली. या भागातील मतदारांनी त्यांना आपला पाठिंबा व्यक्त केला .सर्व भागांमध्ये त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले .
तसेच त्यांच्या या प्रचार फेरीत सायकल स्वार आणि दुचाकीस्वार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अभय पाटील यांनी या भागामध्ये विकास कामे केली आहेत . त्यामुळे आमचा पाठिंबा त्यांना राहील अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांकडून मिळाली.
अभय पाटील यांनी यावेळी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या तसेच ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. नागरिकांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू आशी ग्वाही त्यांनी दिली.
नगरसेवक नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनात ही फेरी यशस्वी झाली आहे. ठीक ठिकाणी सुंदर रांगोळी, फुग्यांचे कमान, व ओवाळणी ने स्वागत केले गेले. अभय पाटील यांच्या नावाचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी या फेरीत भाग घेतले.