बेळगाव:
अभय पाटील यांनी शनिवारी शहापूर दैवज्ञ मंगल कार्यालय येथून प्रचार फेरीला सुरुवात केली. महात्मा फुले रोड,गुडशेड रोड, शास्त्रीनगर,गुडशेड रोड,कपिलेश्वर कॉलनी, महाद्वार रोड या भागात अभय पाटील यांनी प्रचार आणि रोडशो करून अपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले.
ठीक ठिकाणी महिलांनी अभय पाटील यांचे आरती ओवाळून स्वागत केले दक्षिण मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि “साबका साथ साबका विकास ” स्वप्न पुर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला विजयी करा असे आवाहन अभय पाटील यांनी केले आहे.
मतदारांनी आपण अभय पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले.या भागाचे नगरसेवक गिरीश धोंगडी आणि राजू भातखंडे यांच्यासह या भागातील सामाजिक कार्यकर्ते देखील या फेरीमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते.यावेळी उपस्थित सदस्यांनी जोरदार घोषणा देवून परिसर दणाणून सोडला.