बेळगाव:
भारतीय जनता पक्षाचे अधिकृत दक्षिणचे उमेदवार आ. अभय पाटील यांनी आपल्या प्रचाराला दक्षिण भागातून सुरुवात केली आहे त्यांनी मतदार संघात विविध भागात प्रचार केला. यावेळी चिदंबर नगर येथील कुडाळदेशकर ब्राम्हण समाजातर्फे त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.
समाजाचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांच्या अध्यक्षतेखाली अभय पाटील यांच्या प्रचाराची बैठक घेण्यात आली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले अभय पाटील यांनी केलेल्या विकास कामांबद्दल आठवण करून दिली. तसेच त्यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेलं उमेदवाराला निवडून देणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक त्यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला