बेळगाव :
भारतीय जनता पक्ष देशाला लुटत आहे. आज प्रधानमंत्री मोदींचे मित्र मालामाल होत आहेत, तर दुसरीकडे देश बेहाल होत आहे, अशी टीका करून भाजपने पराभव पचवायला शिकले पाहिजे जे आता त्यांना कर्नाटकात शिकावे लागेल. मोदींच्या लाटेवर भाजपचा विश्वास असेल तर त्यांनी आणि निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनच्या बाबतीतील शंका दूर करावी, अथवा मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे, असे आवाहन आम आदमी पक्षाचे नेते पंजाबचे मुख्यमंत्री भगतसिंग मान यांनी दिले. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बेळगाव दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी बेळगाव उत्तर मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार राजकुमार टोपणन्नावर यांच्यासह आपचे पदाधिकारी उपस्थित होते.