खानापूर (प्रतिनिधी) :
खानापूर तालुक्यात गेल्या दोन वर्षा पासुन खानापूर आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खेडोपाडी जाऊन समस्यांचे निवारण केले. खेड्यापाड्यात आम आदमी पक्षाचा प्रसार करून लोकाच्या मनात आम आदमी पक्षाबदल आदर निर्माण केला. सरकारी कार्यालयात लोकांच्या समस्यांचे निवारण केले.खानापूर आम आदमी पक्ष नेहमी तालुक्यात चर्चेत असताना नुकताच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हास्तरीय आम आदमीचे वरिष्ठ नेते खानापूर तालुक्यातील आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच परस्पर उमेदवारी जाहीर करत आहेत. खानापूर तालुका आम आदमी अध्यक्ष भैरू पाटील अथवा दशरथ बनवली हे उमेदवारीसाठी तयार असताना परस्पर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी निवडीचा प्रयत्न केला.तर आम्ही बहिष्कार घालु असा विचार कार्यालयाच्या बैठकीत व्यक्त केला. यावेळी बैठकीला खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.