भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून बेळगाव दक्षिणमधून आ. अभय पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. समर्थकांनी एकच जल्लोष करीत त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. आमदार अभय पाटील हे बेळगाव दक्षिण मधील प्रबळ उमेदवार मानले जातात. विकासकामांच्या मुद्द्यांवर त्यांनी आपण ही निवडणूक लढवीत असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. मागील पाच वर्षात बेळगाव दक्षिण मतदार संघाचा विकास करण्यासाठी केलेली व्यापक कामगिरी आपल्याला निश्चितच विजयाकडे नेणारी आहे असे त्यांनी सांगितले. सर्व जातीय आणि सर्व भाषिक मतदारांनी आपल्या उमेदवारीचे स्वागत केले असल्याची माहिती त्यांनी दिली.