बेळगाव :
घटप्रभा नदीकाठी पोहायला गेलेल्या सहा पैकी चार जणांचा शुक्रवारी बुडून मृत्यू झाला. दुपारी 2.15 च्या सुमारास ही घटना घडली आहे.
उत्तर कन्नड जिल्ह्यातील मुंडगोड तालुक्यातील शिरगेरी गावातील चार जण धुपदाळ मंदिराजवळील घटप्रभा नदीत बुडाले. मृतांमध्ये संतोष बाबू (19), अजय बाबू जोरे (19), कृष्णा बाबू जोरे (19), आनंदा विट्टू कोकडे (20) अशी मृतांची नावे आहेत तर विठ्ठल जाणू कोकडे (19) व रामचंद्र कोकडे (19) हे थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्यावर घटप्रभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
मृत व्यक्ती घटप्रभा येथील एका बारमध्ये कामाला आहेत.आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुट्टी असल्यामुळे ते पोहायला गेले होते. सहा जण पोहायला गेले होते त्यापैकी चोघांचा मृत्यू झाला तर दोघांवर घटप्रभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.