समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर येळ्ळूरकर
बेळगाव :
बेळगाव उत्तर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून ऍड. अमर येळूरकर यांची निवड करण्यात आली.
गुरुवार दि. 13 रोजी मराठा मंदिर येथे 25 सदस्यांच्या निवड कमिटीच्या बैठकीत जनमताचा कौल घेऊन उमेदवार निवड करण्याचे ठरविण्यात आले.
त्यानुसार उत्तर मतदारसंघात जनमत घेण्यात आले उत्तर मतदारसंघातून नगरसेवक शिवाजी मंडोळकर व ऍड. अमर येळ्ळूरकर हे उमेदवारीचे दावेदार होते उमेदवार निवडीसाठी जनमताचा कौल लक्षात घेऊन ऍड. अमर येळ्ळूरकर यांची समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली.