बेळगाव :
शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतेच नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व विभागातील कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या यादीत समाविष्ट करून घेण्यात आला आहे. रविवारी सकाळी 10 वाजता जतीमठ येथील शिवजयंती चित्ररथ महामंडळाची बैठकित नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक गुणवंत पाटील होते. अध्यक्षपदी सुनील जाधव यांची सर्वानुमते फेरनिवडकरण्यात आली. उपाध्यक्ष मेघन लगरकांडे, राहुल जाधव, रवी निर्मळकर, श्रीकांत प्रभू, कार्याध्यक्ष प्रसाद मोरे, सरचिटणीस जे. बी. शहपूरकर, चिटणीस सूरज मंडोळकर,संतोष कणेरी, खजिनदार विनायक बावडेकर,उपखजिनदार ओमकार पुजारी, किरण मोदगेकर, अनंत बामणे, हिशोब तपासणी श्रीधर देसाई, संदीप सुंकठ,द्वारकानाथ पेडणेकर, आदित्य पाटील, प्रभाकर देसुरकर सल्लागार नियंत्रण प्रमुख गुणवंत पाटील, जनसंपर्क विभाग प्रमुख, अरुण पाटील, लोकेश रजपूत, विक्रम भातकांडे,राजन जाधव यांची निवड करण्यात आली.