विजेच्या बिल प्रति युनिट ५७ पैसे फ्युअल कॉस्ट वाढविले
बेळगाव :
हेस्कॉमने या महिन्यापासून विद्युतबिलात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्युअल ॲण्ड पॉवर पर्चेस कॉस्ट अॅडजेस्टमेंटच्या दरामध्ये प्रतियुनिट वाढ करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना वाढीव वीजबिल दिले जात आहे. यामुळे वीजबिलाचा वाढीव बोजा ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.
घरगुती ग्राहकांसह औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांनाही या वाढीव वीजबिल येणार आहे. हेस्कॉमच्या हुबळी येथील नियंत्रकांनी ३१ मार्च रोजी एक आदेश बजावत फ्युअल कॉस्टमध्ये वाढ केली जाणार असल्याने बिलामध्ये वाढ होणार असल्याचे जाहीर केले.
त्यानुसार १ एप्रिलपासून सर्व ग्राहकांना वाढीव वीजबिले मिळत आहेत. विजेच्या वापरानुसार २० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत यामध्ये वाढ करण्यात आली आहे. या महिन्यातील बिलामध्ये वाढ झाली कर्नाटक विद्युत नियामक मंडळाने (केईआरसी) फेब्रुवारी महिन्यात फ्युअल कॉस्टमध्ये वाढ झाल्यानेदरवाढ करण्याचा निर्णय घेतला होता.
या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून केली जात आहे. या महिन्यात येणाऱ्या बिलामध्ये प्रती युनिट ५७ पैसे फ्युअल कॉस्ट वाढविण्यात आले आहे. आहे.