नवी दिल्ली : साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा निवडणुक उमेदवार यादीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. काल शनिवारपासून नवी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ स्तरावर बैठकांवर बैठका सुरू आहेत.
दरम्यान आज रविवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी,भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नरेंद्र जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बैठकीनंतर भारतीय जनता पक्षाचे पहिली यादी रात्री उशिरा जाहीर होण्याचे शक्यता व्यक्त केले जात आहे. बैठक रात्री उशिरापर्यंत सुरूराहिल्यास उमेदवारी यादी उद्या सकाळी जाहीर होऊ शकते.