14 किलो वजनाचे चांदीचे दागिने हिरेबागेवाडी चेकपोस्ट येथे जप्त
बेळगाव :
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यात होत असलेल्या बेकायदेशीर कृत्यांची गंभीर दखल घेत वाहनांची तपासणी केली जात आहे. याच अनुषंगाने काल गुरुवारी एका तपासणी अंतर्गत हूपरी (महाराष्ट्र) येथून हुबळीला घेण्यात येत असलेली सुमारे 14 किलो 111 ग्रॅम चांदीचे दागिने हिरे बागेवाडी जवळ जप्त करण्यात आले. ज्याची एकूण किंमत 987770 रुपये आहे. शशांक पाटील असे ज्वेलरचे नाव असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे.